करदात्यांच्या सोशिकतेचा गैरफायदा
Kishor Lulla
इंग्रजीमध्ये एक वाक्य कायम वापरले जाते. ते म्हणजे 'जीएसटी इज बेबी ऑफ फोर इयर्स'. माझ्या मते हे वाक्य अतिशय चूक आहे. कायदा येऊन चार वर्ष झाली हे जरी बरोबर असले तरी या 'बेबीच्या' बालक्रीडा पाहता असे लक्षात येते की ही आता वात्रट मुलगी झाली आहे. ती कोणाचेच ऐकत नाही. स्वतःच्या मनाला येईल ते करत जाते. याचे मुख्य कारण म्हणजे तिच्या समोरील सर्व व्यक्ती सोशिक बनल्या आहेत आणि या सोशीकतेचा ती गैरफायदा घेत आहे. असे म्हटले जाते की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा खरा गुन्हेगार असतो. जीएसटीच्या बाबतीत असेच झाले आहे. व्यापारी, उद्.......