Skip to main content
GST Review July-2024

सरकार, मी आणि इतर

Kishor Lulla
लहानपणी मी संजीवकुमारचा पती पत्नी और वो हा सिनेमा पाहिला होता. पती-पत्नीचा उत्तम संसार सुरू असताना जर त्या 'वो' ने काही घोटाळा केला तर काय होते अशा विषयावरचा हा विनोदी चित्रपट होता. होणाऱ्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी संजीवकुमारने मुलासह ठंडे ठंडे पानीसे आंघोळ केली होती. अशीच काही अवस्था सध्या वस्तू आणि सेवा कर कायद्याखाली सर्व नोंदीत व्यापाऱ्यांची झालेली आहे. परंतु त्यानीं गार पाण्याने अंघोळ करून सुटका करून घ्यावी अशी कोणतीही सोय या कायद्यात नाही. योग्य पद्धतीने वस्तू आणि सेवांचा व्यापार करणे, व्यवस्थित जमाखर्चाच्या वह्या ठेवणे, वेळच्यावेळी विवरणपत्रके भरणे, ई इन्व्हाईस आणि ई वे बिल ची व्यवस्थित यंत्रणा राबवणे, हे सगळे करून देखील त्याच्या आसपास असे अनेक 'वो' आहेत की त्यांच्यावर लक्ष ठेवणे दुरापास्त झालेले आहे. मी स्वतः काय केले पाहिजे किंवा काय करतो यापेक्षा माझ्या आजूबाजूच्यांनी काय करावे आणि विशेषतः काय करू नये याचे भान प्रत्येक नोंदीत व्यापाऱ्याला रोज ठेवावे लागते. या आजूबाजूच्यांमध्ये प्रॉपर ऑफिसर, नोडल ऑफिसर, ऑडिट ऑफिसर, इन्वेस्टीगेटिंग ऑफिसर, स्टेट ऑफिसर, सेंट्रल ऑफिसर, चेक.......