Skip to main content
GST Review May-2024

जीएसटी - एक पसरणारा कोरोना

Kishor Lulla
वस्तू आणि सेवा कायद्या अंतर्गत सध्या ज्या काही नोटीसा येत आहेत त्याचे स्वरूप साधारणपणे ठरलेले आहे. ते म्हणजे जीएसटीआर १ आणि जीएसटीआर ३बी  तसेच जीएसटीआर २ए किंवा २बी आणि जीएसटीआर ३बी यामध्ये फरक असणे, त्याचप्रमाणे कलम १६(४), कलम १६(२)(क) प्रमाणे मुदतीत विवणपत्रक भरलेले नसणे, इ वे बिल विक्रीशी मॅच न होणे, टीडीएस मॅच न होणे, बोगस बिले खरेदी करणे, पुरवठादाराने कर न भरणे, तो पळून जाणे किंवा त्याचा नोंदणी दाखला पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करणे, कलम १७ तसेच इतर अनेक मुद्दे काढून  इनपुट टॅक्स क्रेडिट अमान्य करणे अशा प्रकारच्या नोटिसा येत आहेत. वकीलांच्या बोली भाषेत याला मॅचमिसमॅच असे संबोधले जाते. या नोटिसांपैकी ज्या नोटीसा चुकीच्या अगर अपुऱ्या माहितीच्या आधारे येतात त्यामध्ये योग्य पद्धतीने खुलासा केल्यानंतर कोणताही कर भरावा लागत नाही. परंतु ज्या नोटिसा अचूक माहितीच्या आधारे काढल्या जातात आणि त्याचा योग्य तो खुलासा नोंदीत व्यापाऱ्याला देणे शक्य झाले नाही तर त्या बाबतीत मात्र कर, दंड आणि व्याज याची आकारणी होते. करदात्यास ही रक्कम योग्य आणि पुरेशी वाटली तर तो पैसे भरून .......