एका काल्पनिक जीएसटी अधिकाऱ्याचे मनोगत
Kishor Lulla
गेली सुमारे पंचवीस वर्षे मी विक्रीकर खात्यात नोकरी करीत आहे. इन्स्पेक्टर पासून विक्रीकर उपायुक्त पर्यंत सर्व पदे मी सांभाळली. माझ्या परीने अत्यंत प्रामाणिकपणे दिलेली जबाबदारी निभावण्याचा मी सतत प्रयत्न करीत असतो. या कारकिर्दीमध्ये कित्येक लहान मोठे व्यापारी, छोटे मोठे वकील यांचा सतत संपर्क येत असतो. काहींशी अनेक वेळा तात्पुरते वाद देखील झाले. काही खूप चांगले मित्र बनले. कित्येकांना मार्गदर्शन करावयाची संधी मिळाली. अनेक जण माझ्या गुरुस्थानी देखील आहेत. तसेच माझे सहकारी देखील याच पद्धतीचे आहेत. एकंदरीत माझे आयुष्य उत्तम पद्धतीने सुरू आहे. माझ्या नोकरीचा मी आनंद उपभोगीत आहे.
प्रत्येकावर झालेल्या न्याय अन्याया बाबत खूप काही बोलण्यासारखे आहे. त्याचा उल्लेख अनेकांच्या बोलण्यातून, लिखाणामधून येतच असतो. परंतु मला सर्वात जास्त खटकलेल्या एका बाबीचा मात्र या निमित्ताने आवर्जून उल्लेख करावा आणि माझे मनोगत व्यक्त करावे या इच्छेपोटी नवीन व्यापारी वर्षाच्या निमित्ताने मी हे लिखाण करीत आहे. याची दखल सरकार घेईल अशी माफक अपेक्षा देखील व्यक्त करतो.
माहिती अधिकार कायद्या अं.......